पेरिफेरलव्हॅस्क्युलरआजार – Peripheral Vascular Disease (PVD) in Marathi

पेरिफेरल व्हॅस्क्युलर आजार म्हणजे काय?

पेरिफेरल व्हॅस्क्युलर (किंवा अर्टेरियल) आजार (पीव्हीडी) ही एक स्थिती आहे ज्यामध्ये शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्या ल्युमेन मधील कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अरुंद होतात. यामध्ये पायाच्या व पेलव्हिस च्या अर्टरिज वर मुख्यतः परिणाम होतो. यावर उपचार न केल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारखं जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

याची मुख्य कारणे लक्षणे काय आहेत?

सामान्यपणे लक्षणे जाणवत नाहीत. पण काही बाबतीत खालील लक्षणे जाणवू शकतात:-

  • पाय दुखणे व शिथिलपणा.
  • पायाच्या जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ लागणे किंवा काही वेळेस बरं न होणे.
  • निस्तेज किंवा निळसर त्वचा.
  • पायाच्या बोटांवरील नखांची वाढ कमी होणे.
  • पायांवरील केसांची वाढ कमी होणे.
  • दोन्ही पायांच्या उष्णतेमध्ये फरक.
  • अकार्यक्षम इरेक्टाइल.

याची प्रमुख कारणे कोणती?

अथेरोस्क्लेरोसिस हे पीव्हीडी चे मुख्य कारण आहे ज्यामुळे रक्त वाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल तयार होते. पीव्हीडी साठी इतर घटक खालीलप्रमाणे आहेत:

याचे निदान उपचार कसे केले जातात?

पीव्हीडी च्या निदानामधे खालील गोष्टी केल्या जातात:

  • प्राथमिक चाचण्या.
  • वैद्यकीय इतिहासाचा सखोल अभ्यास.
  • शारीरिक तपासणी: अँकल ब्रँकिअल इंडेक्स.
  • इतर चाचण्या: पायाच्या ट्रेडमिल वरील व्यायामाच्या चाचण्या.
  • मॅग्नेटिक रेसोनन्स अँजिओग्राफी.
  • कॉम्प्यूटेड टोमोग्राफी अँजिओग्राफी.
  • पॆरिफेरल अँजॉग्राम.
  • डोपलर अल्ट्रासाऊंड.

उपचारांमध्ये जीवनशैली बदल, औषधे किंवा दोन्ही यांचा समावेश असतो. जर स्थिती अशी निर्माण झाली की जेथे औषधे काम करत नाहीत तर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला जातो.

जीवनशैली बदलांमधील गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:

  • धूम्रपान सोडणे.
  • नियमित व्यायाम.
  • ताण नियोजन.
  • सावधपणाचा सराव.
  • रक्तदाबाचे नियोजन.

औषधांमध्ये:

  • कॉलेस्ट्रॉल पातळ्या कमी करण्यासाठी औषधे.
  • रक्ताचे क्लोटींग थांबवण्यासाठी अँटीप्लेटलेट्स.
  • उच्च रक्तदाब नियोजनासाठी औषधे.

पीव्हीडी उपचाराच्या शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया:

  • अथेरेक्टमी- प्लाक किंवा रक्ताची गाठ काढून टाकण्यासाठी.
  • बायपास- रक्त पुरवठा करण्यासाठी आरोग्यदायी रक्त पेशी द्वारे दुसरा रस्ता तयार करणे.
  • बलोन अँजिओप्लास्टी.